बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी टेकवडे.
पुरंदर प्रतिनिधी...
जवळार्जुन (ता पुरंदर ) गावचे रहिवासी व माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांचे सुपुत्र अजिंक्य टेकवडे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती लोकसभा मतदार संघाच्या युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नीरा येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदार सुप्रियाताई सुळे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते टेकवडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांसह नीरा गावच्या सरपंच तेजश्री काकडे, पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिगंबर दुर्गाडे ,माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे तसेच विजय कोलते ,सुदामराव इंगळे, दत्तात्रेय चव्हाण ,माणिक झेंडे ,विराज काकडे ,अजित सोनावणे , अनिल चव्हाण, मेघराज निगडे ,किरण गदादे भैय्यासाहेब खाटपे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान अजिंक्य टेकवडे यांच्या निवडीने नीरा कोळविहिरे गटात मात्र राजकीय उलथापालथ होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे तर युवा वर्गाकडून देखील अजिंक्य टेकवडे यांचा जागोजागी सत्कार व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागल्याने आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत टेकवडे बाजी मारणार असल्याची दमदार चर्चा नागरिकांमध्ये आहे.