पुरंदरच्या पत्रकारांसाठी कुटुंब कल्याण कोषाची निर्मिती
जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे यांची घोषणा
मार्तंड देवसंस्थान करणार भरीव मदत प्रमुख विश्वस्तांनी दिले आश्वासन
पुरंदर (प्रतिनिधी) - सिकंदर नदाफ .
भारतीय पत्रकार संघाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या कुटुंबाची काळजी घेण्याहेतू कुटुंब कल्याण कोषाची निर्मिती करुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे यांनी केली .
भारतीय पत्रकार संघाची कार्यशाळा जेजुरी येथे श्री मार्तंड देवस्थानच्या भक्तनिवास येथील सभागृहात पार पडली .त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्त पदी पंकज शेठ निकुडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देत असताना त्यांनी भारतीय पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करत कुटुंब कल्याण कोषासाठी देवस्थानच्या वतीने भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले.तर या निधीचा उपयोग पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक व कौटुंबिक अडचणी सोडविण्यासाठी केला जाणार असून या कोषाच्या अध्यक्ष पदी स्वप्निल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.या कार्यशाळेसाठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सिकंदर नदाफ, उपाध्यक्ष संदिप बनसोडे, गुणशेखर जाधव, विधी सल्लागार अँड विजय भालेराव, नारायण आगलावे , राजेंद्र जावळेकर, संदिप झगडे, प्रियंका इटकरे सायली शिर्के, अस्लम नदाफ, प्रविण कदम, दिपक धेंडे, सोमनाथ काळाणे,जयंत पाटील, मयुरेश लेंडे, ह.भ.प. अशोक महाराज पवार आदि मान्यवर उपस्थित होते