Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर मध्ये गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली ; व्यापारी वर्गात समाधान


सोमेश्वरनगर मध्ये गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली ; व्यापारी वर्गास समाधान 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

सोमेश्वरनगर (ता बारामती) परीसरात शुक्रवारी दि:१०  सप्टेंबर रोजी श्रीगणेशाचे आगमन घरोघरी होणार आसल्याने काल पर्यंत बाजारपेठ मध्ये शांतता व शुकशुकाट होता पण आज गणरायाचे प्रतिष्ठापना असल्याने सकाळपासूनच  सोमेश्वरनगर परिसरात  बाजारपेठ फुललेली दिसत आहे ,मूर्ती खरेदी करण्यासाठी वाघळवाडी, करंजेपूल,करंजे, मगरवाडी, देऊलवाडी, रासकरमळा, चौधरीवाडी, होळ,दहा फाटा,सोरटेवाडी,करंजे,करंजेपूल येथील करंजेपुल-सोमेश्वरनगर ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे गणेश मूर्ती घेण्यासाठी  येत असतात  .शासनाने दिलेल्या नियमानुसार  घरगुती गणेशमूर्ती ला दोन फूट तर गणेश मंडळास चार फूट बसवण्यास परवानगी असल्याने सर्वानी दिलेल्या नियमानुसार गणेशमूर्ती विक्रेते यांनीही नियमांचे पालन करत सहकार्य दाखवले. ग्रहकांनमुळे गणेशमूर्ती साठी गुंतवलेली रक्कम मिळेल तर  थोडा फायदा फार फायदा होईल असेही त्यांनी बोलताना सांगितले.
फोटो ओळ - श्रीगणेशाची मूर्ती समवेत चिमुकला सोहम वाघमारे व मित्र परिवार...
गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट असल्याने लग्न, उत्सव यांना काही निर्बंध घातलेले आहेत .
दरवर्षीपेक्षा यावर्षी  मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलचे प्रमाण कमी आहे .
     या मूर्त्यांमध्ये लालबागचाराजा ,दगडूशेठ व विविध आसनावर ती बसलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींची घरगुती साठी  मागणी बाजारपेठेत दिसत आहे .डायमंड मूर्तीचे आकर्षण असल्याने ग्राहकांची वड या मूर्ती खरेदी करण्याकडे आहे .या सर्व श्रीगणेशाच्या मूर्त्या पाचशे रुपयांपासून ते साडेतीनते चार  हजारापर्यंत  बाजारपेठेमध्ये उपलब्ध असल्याची माहिती उपस्थित व्यापार वर्गानी दिली.

करंजेपुल बाजारपेठेत  दर वर्षी गणेशमंडळ चार चाकी, ट्रॅक्टर ट्रॉली, टेम्पो अशी वाहने सूंदर सजावट करत श्री गणेशाची मूर्ती पारंपरिक वाद्य वाजवत नेतात. परंतु सर्वत्रच मंडळाला दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नसल्याची खंत.
-- साम्राज्य मित्र मंडळ(सोमेश्वरनगर)--- 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test