Type Here to Get Search Results !

बारामती!पणदरे येथील गौण खनिज उत्खनन प्रकरणी आंदोलन करणाऱ्या १६ आंदोलकांवर वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गुन्हे दाखल

पणदरे येथील गौण खनिज उत्खनन प्रकरणी आंदोलन करणाऱ्या १६ आंदोलकांवर वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गुन्हे दाखल 


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील पणदरे या ठिकाणी गौण खनिज उत्खनन प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर मिळालेल्या माहिती नुसार वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बेकायदा जमाव जमवून कोणतेही सामाजिक अंतर न राखता, रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाद्य वाजवून मोठमोठ्याने घोषणा देत विनापरवाना रॅली काढून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी  सोळा आंदोलकांवर वडगाव निंबाळकर  पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.  भा.द.वि. कलम 269,270,188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (ब) तसेच महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथीचे रोग प्रतिबंधक का.क.2,3,4 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 134,135

यानुसार 1) विकम भरत कोकरे रा. पणदरे ता. बारामती जि.पुणे 2) ज्ञानदेव श्रीरंग खामगळ 3) शशिकांत जयसिंग खामगळ 4) प्रशांत ज्ञानदेव खामगळ अ.क 2 ते 4 हे सर्व रा. खामगळवाडी ढाकाळे ता.बारामती जि.पुणे 5) अरविंद बनसोडे (पुर्ण नाव माहीत नाही) रा. माळेगाव ता. बारामती जि.पुणे 6) विलास महादेव कोकरे रा. ढाकाळे ता. बारामती जि.पुणे 7) अँड अभिजीत शिवाजी जगताप 8) राजेंद्र झुंबर गायकवाड 9) अमोल जगु सोनवणे 10) प्रताप उर्फ लखन ज्ञानदेव सोनवणे 11) संतोष मारुती काळे 12) सचिन संपतराव निंबाळकर 13) योगेश ज्ञानेश्वर जगताप 14) भिवा महादेव भिसे 15) अर्जुन राघु सोनवणे अ.क 6 ते 15 सर्व रा. पणदरे ता बारामती जि.पुणे 16) ऋषिकेश दत्तात्रय भोसले रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती यांच्यासह अज्ञान दहा ते पंधरा व्यक्तींवर हे गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर अहवाल  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बारामती यांना पाठवण्यात आला असून पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सातव हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test