वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनात ४७ तक्रारींचे निवारण.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मधील मिळालेल्या माहितीनुसार वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे गुरुवारी दि ९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनाचे अनुषंगाने पोलिस स्टेशनला प्रलंबित असलेल्या एकूण १०० वरिष्ठ अर्ज तसेच एकूण २२ रयत अर्जातील अर्जदार यांना तक्रार निवारण दिनाचे निमित्ताने पोलीस स्टेशनला कागदपत्रांसह हजर राहण्याचे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि सोमनाथ लांडे यांनी आयोजित तक्रार आवाहन केलेले होते, सदर आवाहनाला प्रतिसाद देत हजर राहिलेल्या एकूण ४७ अर्जदारांचे अर्जावर कार्यवाही करणेत आलेली असून प्रलंबित अर्जावर आजपर्यंत केलेली कार्यवाही/ चौकशी तसेच अर्जदार यांचेकडील मूळ कागदपत्रांची शहानिशा करून चौकशीत निष्पन्न झालेल्या वस्तुस्थितीवरून २ अर्जावरून २ अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करणेत आलेले आहेत,अर्जामधील अर्जदार व गैरअर्जदार यांची समोरासमोर चर्चा घडवून आणून आपसात वाद मिटून त्यांच्यामध्ये तडजोड झालेने एकूण १७ अर्जाची निर्गती तसेच पोलीस स्टेशन ला प्राप्त एकूण १२ अर्जातील विषय हा दिवाणी बाबींशी संबंधित असलेने सदर अर्जदार यांना मा.न्यायालयात दाद मागणेबाबत समजपत्र देऊन त्या अर्जांची अर्ज निर्गती तसेच एकूण ०९ अर्जावरून सदर अर्जातील गैरअर्जदार यांचे विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करणेत आलेली आहे, याव्यतिरिक्त दुसऱ्या शासकीय कार्यालय/विभाग संबंधित एकूण ०६ अर्ज संबंधित विभागाकडे वर्ग करणेत आलेले आहेत.
२ गुन्ह्यातील वाहने मा.न्यायालयाचे आदेशाने अर्जदारांना परत करण्यात आलेले असून दरोड्याचा गुन्ह्यातील गेला माल सोन्याचे दागिने आरोपी कडून जप्त केलेनंतर फिर्यादीला आजरोजी परत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा.डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा.मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक,बारामती विभाग पुणे ग्रामीण, मा.नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके,योगेश शेलार,सलीम शेख व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.