"आधार फाऊंडेशन" समाज उपयोगी व सृजनशील उपक्रम राबवित राबवत असल्याने खा.सुप्रियाताई सुळे यांनी केले विशेष कौतुक.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
आज अशा उपक्रमांची समाजात गरज आहे.त्यामुळे नविन पिढीवर संस्कार आणि सृजनशीता वाढीस लागेल असे गौरवोद्गार खा.सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केले.
दिवे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात आधार सोशल फाउंडेशनच्या कामाची माहिती घेतल्यावर त्या बोलत होत्या.या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताआबा चव्हाण,आधार सोशल फाउंडेशनचे रोहित जगताप, उद्योजक दिपक साखरे हे उपस्थित होते.या वेळी ताईंचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच आधार फाऊंडेशनचे मार्गदर्शक पुरुषोत्तम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात समाज उपयोगी व सृजनशील उपक्रम राबवित आहे या कामाचे खा.सुप्रियाताई सुळे यांनी विशेष कौतुक केले.व यापुढे आशा कामासाठी सहकार्याचे अभिवचन ही दिले. राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेला पियुष प्रदीप सुर्यवंशी (ओतूर, जुन्नर) याला ताईंच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.आधार या संस्थेचे परिसरात ही कौतुक करण्यात येत आहे.