Type Here to Get Search Results !

वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत मिळणा-या यंत्रमाग घटकांची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक महिन्याची अंतीम मुदत

वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत मिळणा-या यंत्रमाग घटकांची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक महिन्याची अंतीम मुदत
पुणे,  राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. २७ अश्यशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. सदर अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ च्या शासन पत्रान्वये एक महिन्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे, असे प्रादेशिक उपआयुक्त चंद्रकांत टिकुळे यांनी प्रसिदधी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देण्यात आली होती. याबाबत यंत्रमाग घटकांच्या संघटना तसेच लोकप्रतिनीधी यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सदर मुदत दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली होती. परंतु या मुदतीत देखील बहुतांश यंत्रमाग घटकांनी नोंदणी केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन तसेच शासन निर्णय दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ अन्वये २७ अश्यशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. सदर अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ च्या शासन पत्रान्वये एक महिन्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तसेच या मुदतीत जर संबंधित यंत्रमाग घटकांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जोपर्यंत ते सदर नोंदणी करीत नाहीत तो पर्यंत बंद करण्यात यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. तरी संबंधीत यंत्रमाग घटकांनी सदर मुदतीच्या आत आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन (२७ अश्वशक्तीखालील घटक) नोंदणी करणे आवश्यक आहे, असे वस्योद्योग आयुक्त शीतल तेली-उगले, यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test