मु.सा. काकडे महाविद्यालयात पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण-मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन
महाविद्यालयात पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र, फिटनेस सेंटर , सुसज्ज वाणिज्य विभाग आणि ई- बुक सेवा व वाढीव वाचन कक्ष या एकमेकांशी पूरक उपक्रमांच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम वडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या हस्ते पार पडला.
पोलीस व सैन्य भरती संदर्भात चर्चा करताना API सोमनाथ लांडे व उपस्थित मान्यवर
या उद्घाटन प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रामध्ये मार्गदर्शन व पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने घेतलेल्या निर्णय प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्ती सोबतच लेखी परीक्षेचा सराव करणे गरजेचे आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये आपण भरतीला उतरणार आहोत त्या जिल्ह्याचे भौगोलिक ज्ञान व अध्ययन करणे गरजेचे आहे. मैदानी परीक्षेतील गुण हे आपल्या हातातील गुण आहेत, त्याचा सराव विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर येऊन करावा. लेखी परीक्षेसंदर्भात महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी जबाबदारी घ्यावी, त्यासाठी विशेष व्याख्याने आयोजित करावीत. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या भरतीमध्ये महाविद्यालयातून जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस भरती व्हावेत ह्या सदिच्छा त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कोरोना काळातील शारीरिक तंदुरुस्तीसाठी फिटनेस सेंटर चा वापर करावा. प्रशस्त अशा वाचन कक्षामध्ये उपलब्ध असणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकांचाही वापर विद्यार्थ्यांनी करावा असेही सुचवले. वाणिज्य विभागाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल व असणाऱ्या संधी यावरही त्यांनी विचार व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्रा.जवाहर चौधरी यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा देण्याचा महाविद्यालयाचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याचाच भाग म्हणून आज हे उद्गाघन आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजीत काकडे-देशमुख हे होते. या प्रसंगी सचिव प्रा जयवंतराव घोरपडे , संकेत जगताप, नितीन कुलकर्णी , प्रा. शिवाजीराव शिंदे ,सह-सचिव सतीश लकडे उपप्राचार्य डाॅ. प्रवीण ताटे देशमुख , डॉ. जे. एम. साळवे, डॉ. जया कदम, सुजाता भोईटे , डॉ. देविदास वायदंडे, डाॅ. संजू जाधव, प्रा. आर. एस. जगताप उपस्थित होते, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा दत्तराज जगताप , लडॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ. राहुल खरात, प्रा. रविकिरण मोरे, अमोल लकडे, निखिल जगताप, सुजित काकडे, शुभम गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. व समन्वयक प्रा. दत्तराज जगताप यांनी आभार मानले.