बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडुन पक्के लायसन्स अनुज्ञप्तीचा कोट्या मध्ये वाढ़
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
केंद्रीय महामार्ग मंत्रालय यांच्या अधिसूचनेनुसार पक्के लायसन्स अनुज्ञप्तीविषयीची वैधता दिनांक ३०-०९-२०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सबब प्रलंबितता व गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, म्हणजेच शनिवार व रविवार कार्यालयात, प्रतिदिन १५० याप्रमाणे पक्के अनुज्ञप्तीचा कोटा वाढविण्यात आलेला आहे. तरी या सुविधेचा पक्के लायसन्स अनुज्ञप्ती धारकांनी, याचा लाभ घ्यावा. उपरोक्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पक्या लायसनची चाचणीची वेळ सकाळी ०८ ते दुपारी ०२ वाजेपर्यंत असेल याची नोंद घेण्याबाबतचे आव्हान बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील व राजेंद्र केसकर यांनी केले आहे.