सोमेश्वनगर मध्ये बाजरी काढणीला सुरुवात
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यामध्ये बाजरी काढणीची लगबग सुरू असून अनेक शेतकरी मजुरवर्ग व इरजिक पद्धतीने बाजरी काढीत सुरू आहे.
बारामती तालुक्यात यावर्षी रब्बीच्या पिकांसाठी आवश्यक असणारा पाऊस जोरदार झाला आहे. यामुळे तालुक्यात यंदा बाजरी,ज्वारी, गहू, हरभरा, तूर या पिकांच्या विक्रमी पेरण्या झाल्या होत्या. याशिवाय वेळेवर वीर धरण निरा डावा कालव्याही आवर्तन सुटले होते तसेच झालेल्या पावसामुळे विहिरींना पाणी असल्याने वेळेत पाणी पिकांना मिळाले आहे.
शेतीला अनेक वर्षांपासून पाणी असूनही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने अडचण होत होती. . पूर्वी रात्री कधीतरी वीज येत असे या वेळी अनेक ठिकाणी दिवसाही वीज मिळत असल्याने शेतकरी समाधानी होते.
तालुक्यातील जिरायत भागात मुर्टी, पळशी ,लोणी भापकर , चौधरवाडी, मगरवाडी , रासकर मळा, माळवाडी , चौधरवाडी-भापकरमळा या गावांमध्ये बाजरी ,ज्वारी आणि कांदा पीक घेण्यास प्रसिद्ध आहे. तालुक्यात या वेळी/शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी धरती ( पुरुषोत्तम ) या जातीची बाजरी हाजारो हेक्टर पेरणी झाली आहे.आणि त्याचे कणीस धान्याने चांगले भरलेले असून त्याची वाढही एक फुटा पर्यंत झाली आहे, त्यासाठी हवामान चांगले राहिल्याने पिकांवर फारसा रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. वेळेवर पाणी व पोषक हवामान यामुळे एकरी सोळाशे ते सतराशे क्विंटल (एकरी 16/17 )उत्पादन होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त असून तालुक्यात विक्रमी उत्पादन होऊ शकते.
बाजरी या वर्षी चांगला बाजारभाव मिळेल ही अपेक्षा दुसऱ्या पिकाकडे न वळता पीक घेतले आहे. बाजरी हे पीक घेण्यासाठी पंधरा हजाराच्या आसपास खर्च झालेला असून खर्चाच्या दुप्पट बाजरीचे उत्पादन मिळावे.
...शेतकरी नितीन शेंडकर...