'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या विविध योजना समाजासाठी फायदेशीर - प्रणव कुमार
सोमेश्वरनगर प्रतिनिधी.
बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे शुक्रवार दि. 3 सप्टेंबर 2019 रोजी महाविद्यालय प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र नीरा शाखेचे मुख्य व्यवस्थापक प्रणव कुमार व सहाय्यक व्यवस्थापक विश्वराज धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष याचे औचित्य साधून महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी त्यांच्याशी संबंधित आरोग्यसेवेच्या कर्ज सुविधा, गृहकर्ज, वाहन कर्ज, शेतकरी कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज, इ. विषयीची आवश्यक ती माहिती मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र नीरा शाखेचे मुख्य शाखा व्यवस्थापक प्रणव कुमार यांनी बँकेच्या विविध योजना कशा लाभदायक होतात याची माहिती दिली. तर सहाय्यक शाखा व्यवस्थापक विश्वराज धुमाळ यांनी बँकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या कर्ज सुविधा एफ.डी. इत्यादींविषयी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक डॉ. निलेश आढाव यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, प्रा. रजनीकांत गायकवाड कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे समन्वयक डॉ. संजय जाधव इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कृतज्ञतापर आभार डॉ. दत्तात्रय डुबल यांनी मानले.