महिलांनी स्वबळावर उभे रहावे - सभापती नीता फरांदे
फोटो ओळ कार्यक्रम प्रसंगी बोलताना सभापती नीता फरांदे व उपस्थित मान्यवर व महिला वर्ग
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान पंचायत समिती बारामती यांच्या अंतर्गत महिला सक्षमीकरण महिला बचत गट स्थापना कार्यक्रम वाकी (ता बारामती ) येथे श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दि १ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे होत्या तर बोलताना फरांदे म्हणाल्या की महिलांनी सक्षम होण्यासाठी या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान पंचायत समिती बारामती यांच्या अंतर्गत महिला बचत गटाची स्थापना करून बचत गट चांगला व सक्षम करावा पंचायत समितीशी संलग्न असल्याने यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायसाठी व शासनाच्या असणाऱ्या कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध व विविध योजनांचा फायदा होणार आहे. तसेच महिलांचा आपल्या कुटुंबाला नक्कीच हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर महिला बचत गट 'उमेद' अभियान स्थापना व माहिती देण्यासाठी तालुका व्यवस्थापन पंचायत समिती बारामतीचे विनोद लांडगे तर प्रभाग समन्वयक पंचायत समिती बारामतीचे सिकंदर अत्तार यांनी महिला बचत गटाची माहिती देत उपस्थित महिलांना महिला बचत गट स्थापन करत महत्त्व पटवून दिले , नियम अटी सांगत त्यांना मार्गदर्शन केले तर या बचत गटाची व्याप्ती जिल्ह्यात विस्तारलेली आहे. तर बारामती तालुक्यात दहा हजार बचत गट स्थापना चे ऑनलाइन उद्दिष्ट आहे तर आज आखेर १,५२५ महिला बचत गट स्थापन झाली आहे तर तालुक्यातील पंधरा हजार महिला यामध्ये समाविष्ट आहेत.
वैयक्तिक बचत गट मध्ये कोणत्याही योजनेचा लाभ होत नाही त्यामुळे शासनाने संलग्न असणार्या उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गट केल्यास विविध योजनांचा लाभ होणार आहे,हा गट ऑनलाइन करून तीन महिन्यांनी झाल्यावर खेळते भांडवलही देत असते , त्यामुळे याचा महिलांना भविष्यात नक्कीच फायदा होणार असल्याचे व्यवस्थापन अधिकारी लांडगे यांनी सांगितले.
यावेळी श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे , वाकी सरपंच किसन बोडरे , उपसरपंच हनुमंत जगताप, ग्रामसेवक नीलांबरी खैरे,सदस्य वर्षाराणी जगताप, शालन जगताप ,कल्पना जगताप, सुनिता जगताप, सुधीर गायकवाड वाकी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अनिल भंडलकर , मा.तंटामुक्ती अध्यक्ष कुंडलिक जगताप ,सामाजिक कार्यकर्ते शिवराम गाडेकर , गजानन गाडेकर, भारतीय पत्रकार संघ उपाध्यक्ष विनोद गोलांडे, उपस्थित होते.