तळेगाव ढमढेरे येथे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून स्वराज्यातील जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सलग १४ वर्ष ब्रिटिशांच्या विरोधात लढा देऊन मातृभमीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना २३० व्या जयंतीनिमित्त तळेगाव ढमढेरे येथील आद्यक्रांतीवीर चौक, ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे, कु.जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळा व स्वा. सै. रायकुमार गुजर विद्यालय, येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बाजार समितीचे मा. सभापती विश्वासकाका ढमढेरे, पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महेशबापु ढमढेरे, आर पी आय शिरूर तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे, सरपंच अंकिताताई भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, ग्रा.पं. सदस्य विशाल आल्हाट, उद्योजक सुदर्शन तोडकर, उद्योजक संदिपअण्णा ढमढेरे, उद्योजक प्रशांत गायकवाड, विक्रांत शितोळे, मनेश ढवळे, अतुल ढवळे, राजेंद्र पांढरे, विकास ढवळे, नितीन ढवळे, अथर्व ढवळे, प्रशांत ढवळे, स्वा. सै. रायकुमार गुजर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पिंगळे मॅडम व सर्व शिक्षक वर्ग, कु. जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भुजबळ सर व सर्व शिक्षकवर्ग, ग्रामपंचायतचे कर्मचारी, नागरीक व जय मल्हार क्रांती संघटना तळेगाव ढमढेरे चे सर्व पदाधिकारी व उपस्थित होते.