सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातर्फे पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करावा याबद्दल मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय सोमेश्वर नगर इलेक्ट्रनिक्स विभागातर्फे दिनांक ०६ सप्टेम्बर २०२१ रोजी पर्यावरणपूरक गणपती उत्सव कसा साजरा करावा याबद्दल ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमधे जवळपास ६०/१०० विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. धनंजय बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्याचे वाढते प्रदूषण लक्षात घेता आपण सण - उत्सव साजरे करत असताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. इलेक्ट्रोनिक्स विभागाच्या सहा. प्रा. मृणाली चव्हाण यांनी पर्यावरण पूरक गणपती मूर्ती कशी बनवायची , त्याबरोबर प्लास्टिक चा वापर न करता पानाफुलांपासून सजावट करणे, कागदी फुले बनवणे व त्यांचा वापर करून सजावट करणे याचेही प्रात्यक्षिक दाखवले. मुलांनीही ते करून पाहिले. सर्व सहभागींना इ - प्रमाणपत्र देण्यात आली. सहा. प्रा. रुपाली पंडित यांनी सूत्रसंचालन केले. सहा. प्रा. प्रीती शिंदे, सहा. प्रा. सुनिता घाडगे , सहा प्रा. मयुरी यादव , सहा. प्रा. पाचुकांत होळकर यांचे
विशेष सहकार्य लाभले.