Type Here to Get Search Results !

वढाणे गावातील विकास कामांसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार -विश्वास देवकाते

वढाणे गावातील विकास कामांसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार -विश्वास देवकाते
सुपे प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या वढाणे गावातील विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार आहे असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी व्यक्त केले.
वढाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवक शाखेच्या फलकाचे उद्घाटन देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार केला.
बारामती तालुक्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असल्याचेही देवकाते यांनी नमूद केले.
वढाणे येथील राष्ट्रवादी युवक शाखेच्या अध्यक्षपदी सचिन चौधरी उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे तानाजी लकडे सचिवपदी सागर कौले,अनिल लकडे,दिपक दिवटे,गोरख भापकर अशी कार्यकारिणी करण्यात आली.
यावेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,या भागातील सोमेश्वरचे संचालक गणेश चांदगुडे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाबळे, पोपटराव पानसरे ,संपतराव जगताप, शौकत कोतवाल ,विठ्ठल खैरे, कालिदास भोंडवे, हरीभाऊ भोंडवे ,रत्नप्रभा चौधरी ,राजेंद्र भोंडवे, अॅड . ज्ञानदेव चौधरी देवराम चौधरी, मोहन चौधरी 
बी .आर .चौधरी, मच्छिंद्र चौधरी रामभाऊ लकडे, बाळासो भोंडवे,सुनिल चौधरी,चंदन चौधरी,भानुदास चौधरी,यशवंत चौधरी अर्जुन चौधरी ,प्रकाश चौधरी शिवाजी कौले ,बाबाजी शिंदे ,शंकर लकडे, संतोष गोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ चौधरी यांनी तर आभार प्रगती चौधरी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test