रिद्धी सिद्धी सोबत “बाप्पा” हिमालयात विराजमान
जेजुरी परिसरातील घरगुती गणपतीची आकर्षक आरास !!
पुरंदर प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
यंदा सर्वत्र गणेशोत्सव साधेपणात साजरा होत असला तरी घरोघरी मात्र बाप्पा दिमाखात विराजमान झाले आहेत.जेजुरी परिसरात अनेकांनी फुलांची आरास मंदिरे ,विविध काल्पनिक तसेच ऐतिहासिक देखावे देखील घरातच तयार केले असून गणरायाच्या भोवताली केलेली आरास सर्वांसाठी लक्षवेधी ठरत आहे.
जेजुरीच्या महादेव नगर मधील शेलार कुटुंबीयांनी घरातच हिमालयाचा देखावा साकारला आहे. घरातील वापरात न येणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करून त्यापासून हिमालयातील पर्वत रांगा शिवलिंग आणि त्यामध्ये रिद्धी सिद्धी सोबत विराजमान बाप्प्पा ची नयनमनोहारी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान चित्रकलेची आवड असलेल्या साक्षी संजय शेलार या बारावीत शिकणाऱ्या मुलीने जिजामाता हायस्कूलचे शिक्षक अमित सागर यांच्या प्रेरणेतून हिमालयाचा देखावा साकारला असून अनेक गणेश भक्तांची मने देखील जिंकली आहेत.
यावेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे जमादार अरविंद बाबर यांसह महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे ह.भ.प.अशोक महाराज पवार राजाराम महाराज यादव ,नामदेव यादव .मानसिंग जगताप. रियाज खान .आदर्श शिक्षक जालिंदर घाटे आदी मान्यवरांनी शेलार कुटुंबीयांचे कौतुक केले .