जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन.
जेजुरी पोलीस ठाण्यात तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांनी-ज्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय, जेजुरी पोलीस ठाणे आपले सरकार किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज केलेली असतील किंवा पोलीस ठाण्यास अर्ज केलेले असतील त्या सर्वांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये दिनांक 9/ 9/2021 रोजी सकाळी 10 वाजता जेजुरी पोलीस ठाणे येथील हॉलमध्ये सर्वांचे तक्रार निवारण करण्यात येणार आहे. तरी सदर बातमी ही नोटीस समजून सर्व तक्रार यांनी जेजुरी पोलीस ठाणे या ठिकाणी उपस्थित राहावे.
तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून तक्रारदार यांच्या तक्रारीचे ताबडतोब निवारण करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन यांना आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित अर्जदार, गैर -अर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारीवर त्वरित निर्णय घेऊन, पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
संबंधित तक्रारदार यांनी गुरुवारी दिनांक 9/9 /20 21 रोजी सकाळी १० वाजता न चुकता उपस्थित राहावे. सदर तक्रार निवारण दिनास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील व अन्य वरिष्ठ अधिकारी देखील भेट देणार आहेत. जेजुरी पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी बीट अंमलदार व इतर कर्मचारी या तक्रार निवारण दिनास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीचे त्याच दिवशी जागच्याजागी निराकरण केले जाणार आहे .
जास्तीत जास्त तक्रारदार यांनी त्यादिवशी उपस्थित राहून आपल्या तक्रारीचा ताबडतोब निपटारा करून घ्यावा. असे आवाहन जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले आहे.