Type Here to Get Search Results !

बारामती ता पोलीस स्टेशन येथील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस 5 लाख 28 हजार रुपये किंमतीचे मुद्देमालासह चार आरोपीना ताब्यात:स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ची कामगिर

बारामती ता पोलीस स्टेशन येथील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस 5 लाख 28 हजार रुपये किंमतीचे मुद्देमालासह चार आरोपीना ताब्यात:स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ची कामगिर

बारामती प्रतिनिधी...
बारामती  ता पोलीस स्टेशन मिळालेल्या माहिती नुसार  शुक्रवारी दि 3रोजी सकाळी 10 वाजणे पूर्वीं मोजे शिरवली ता.बारामती येथील नीरा नदीचे बंधाऱ्याचे एकूण 26 बर्गे किंमत रुपये 36000 चे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले बाबत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा शेतकऱ्याचा शेती शिंचनाच्या प्रश्नाशी निगडित असल्याने मा.पोलीस अधीक्षक, डॉ.अभिनव देशमुख साो. यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सदर गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुरुवार दि.9 रोजी सांगवी ता.बारामती भागात पेट्रोलिंग करीत असताना  एक बलेरो पिकअप संशयावरून ताब्यात घेतली व त्यातील दोन संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपास केला असता  त्यांनी त्यांचे शिरवली (ता बारामती) येथील एका साथीदाराच्या मदतीने सदरचे गुन्हे केले असून त्यातील मुद्देमाल हा कोंढवा पुणे येथील भंगरवाल्यास विकला असलेबाबत सांगितले वरून त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात गेला माल व गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप असा एकूण 5 लाख 28 हजार रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला असून सदर गुन्ह्याचे कामी 
1) युवराज आप्पाजी जगताप वय 48   
      रा.सासवड ता पुरंदर जि पुणे, 
2) सत्यवान सर्जेराव सोनवणे वय 40    
      रा सोनोरी ता,पुरंदर जि पुणे 
3 ) प्रमोद अरविंद खरात वय 26 रा     
       शिरवली ता बारामती जि पुणे 
4) कादर कासीम शेख वय 49 निसर्ग     
      हाईट 3 रा मजला प्लॅट नं,7 रा     
      मार्केटयाड पुणे यांना अटक केली       
      असून त्यांनी 
1) बारामती तालुका गु,र,नं
     531/2021 भा,द,वि,क,379    
2) 538/2021 भा,द,वि,क,379 
3) 494/2021 भा,द,वि,क,379  सदरचे गुन्हे केल्याबाबत कबुली दिली आहे, तरी त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी बारामती तालुका पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
      ही कारवाई मा.पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख , मा अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर .यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,पोलिस निरीक्षक  महेश ढवान,पो,स,ई, अमोल गोरे,पो,स,ई, शिवाजी ननावरे, पो हवा.अनिल काळे,पो.हवा.रविराज कोकरे, पो.हवा.बाळासाहेब कारंडे, पो.ना.अभिजीत एकशिंगे,पो.ना.स्वप्निल अहिवळे चालक सहा.फौज. काशिनाथ राजापुरे
यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test