201 बारामती विधानसभा मतदार याद्यांचा
पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर
बारामती - मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. सदर पुर्नरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 09 ऑगस्ट 2021 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्कीक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी करणे व योग्य प्रकारे विभाग /भाग तयार करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पुर्नरिक्षण उपक्रमामध्ये दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे. दि.1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्विकारणे. दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी दावे व हरकती निकालात काढणे. विशेष मोहिमांचा कलावधी मा.मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून निश्चित केलेले दिवस प्राप्त हेाताच प्रसिध्दी देण्यात येईल. दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी, 201 बारामती विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.