शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या घोलेरोड पुणे येथे इ.11 वीच्या व्दिलक्षी अभ्यासक्रमाच्या विषयांना प्रवेश सुरु
पुणे : शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या घोलेरोड पुणे येथे इ.11 वीच्या व्दिलक्षी अभ्यासक्रमाच्या विषयांना प्रवेश देणे सुरु असल्याचे शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.बी.देशमाने यांनी कळविले आहे.
मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स या विषयासाठी 50 जागा उपलब्ध, फर्ग्युसन कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स या विषयासाठी 100 जागा उपलब्ध, आबासाहेब गरवारे ज्युनिअर कॉलेजमध्ये मेकॅनिकल मेन्टेनन्स या विषयासाठी 100 जागा उपलब्ध, नुतन मराठी विद्यालय(मुलींचे), अभिषेक विद्यालय चिंचवडमध्ये स्कुटर अँड मोटार सायकल सर्व्हिसिंग या विषयासाठी 50 जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक वर्षी फी रु. 1 हजार 200 एवढी आहे. विद्यार्थ्यांनी संलग्न महाविद्यालयामार्फत प्रवेश घ्यावा, प्रवेश हा मेरीटनुसार दिला जातो, असेही शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमाने यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.