Type Here to Get Search Results !

पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील

पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील 

बारामती प्रतिनिधी

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका उच्च न्यायालयात केली असल्याचे इंडिया अगेन्स्ट करपशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले गोपीचंद पडळकर यांनी मागील काही दिवसापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे व सोलापूर येथे सभेत रात्र गेली हिशोबात पोरग॔ नाही नशिबात असे अश्लील व भडंग वक्तव्य करुन आपली प्रसिद्धी करुन घेतली व शरद पवार यांना बदनामीकारक भाषा वापरली आहे याबाबतीत मा उच्च न्यायालयाच्या निदर्शनास हेमंत पाटील यांनी आणुन दिले कलम 120b ,, 159 , 146 & 500 of ipc प्रमाणे गुन्हे दाखल करुन पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत पडळकर यानी शरद पवार यांच्या विरोधात कोणते ही अपशब्द वापरु नये असे जनहित याचिकेत म्हटले आहे गोपीचंद नमस्कार हे सतत शरद पवार यांच्या विरोधात काहीही बोलुन आपली लायकी घालवत असतात मा नरेंद्र मोदी भारताचे प्रधान मंत्री व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांचा राजकीय सल्ला घेत असतात व भाजपाचे केंद्रीय मंत्री बारामतीतील विकास कामे पाहणी साठी बारामतीचा दौरा करत असतात  त्यामुळे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना अशी वक्तव्य करणे शोभत नाही असे हेमंत पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test