Type Here to Get Search Results !

श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळात ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा.

श्री  सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळात ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विज्ञान (वरिष्ठ) महाविद्यालय, शरदचंद्र पवार काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नोलाॅजी, शरदचंद्र पवार इनस्टिट्युट आॅफ टेक्नोलाॅजी व शरदचंद्र पवार काॅलेज अाॅफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च  यांच्या संयुक्त  ध्वजारोहणाचा कार्यक्रम महाविद्यालय प्रागंणात पार पडला.
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत वाघळवाडीच्या सरपंच नंदाताई सकुंडे होत्या.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सैनिक  भगवान माळशिकारे हे लाभले.
   मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विज्ञान महाविदयालयाच्या विद्यार्थ्यींनी कु. प्रांजल होळकर, कु. राखी हुलगे, कु. वैष्णवी जगताप, कु. वैशाली खोमणे यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीताचे गायन केले. "भारत माता की जय" हे तीन नारे देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यींनीने  देशभक्तिपर गीताचे गायन केले.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यींनीना बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी सैनिक. कदम,.तुषार सकुंडे, प्राचार्य एस. के. हजारे, प्राचार्य डाॅ. संजय देवकर, प्राचार्य धनंजय बनसोडे हे उपस्थित होते. 
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  भोसले सर यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा. मयुरी यादव यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन क्रिडा अधिकारी प्रा. किशोर साळुंके व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. यावेळी बहुसख्येंने शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग उपस्थित होता. कोव्हिड -१९ नियमांचे पालन करुन कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test