कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित नवीन योजना संदर्भात आढावा बैठक संपन्न
मुंबई दि,१०: कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्तावित योजनांची घोषणा करण्यात आली होती.
सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालायात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, उपसचिव का.गो.वळवी,पणन संचालक सतीश सोनी,व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, सहसंचालक विनायक कोकरे, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण,विक्रीयोग्य उत्पादनांच्या प्रभावी हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी विपणनाच्या पायाभूत सुविधांचा विकास, शेतमालाची साफसफाई, प्रतवारी करुन तात्पुरती साठवणुक, फळे, भाजीपाला व फुले या सारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जावाढ,काढणी-पश्चात आणि आणि हाताळणी दरम्यान होणारे नुकसान कमी करुन अंतिमत: शेतक-यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे, बाजार समितीसाठी नविन उत्पन्नाचे स्त्रोत निर्मिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.