Type Here to Get Search Results !

मु.सा. काकडे महाविद्यालयात रोजगार आणि उद्योजकता' या विषयावर आनलाईन एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

मु.सा. काकडे महाविद्यालयात रोजगार आणि उद्योजकता' या विषयावर आनलाईन एक दिवसीय कार्यशाळा संपन्न 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अणि मु. सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 'रोजगार आणि उद्योजकता या विषयावर आनलाईन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आले. कार्यशाळेचे उद्धघाटन महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितिचे संचव, प्रा. जयवंत घोरपड़े यांच्या शुभ हस्ते झाले व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितित झाले ही कार्यशाळा विद्यार्थानसाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले ही कार्यशाळा दोन सात आयोजित केली होती पहिल्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध कृषि उद्योजक  किम वाघ (वाठार कॉलनी) यांनी 'कृषी आधारित उद्योग अणि युवक' या विषय पर अपने विचार व्यक्त केले. ते म्हणाले की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे सततच्या होणारा लॉकडाउन मुळे सर्वच क्षेत्रातील उद्योग धंद्याना मोटा आर्थिक फटका बसला आहे. आज विद्यार्थिनी पारंपरिक शिक्षाना सोबत किमान कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी व्हावे, ही काळाची गरज आहे नाहीतर देशात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. कोरोना मुळे अनेकांची नोकरी गेली आहे. अशा युवकांनी शेतीसी सबंधित छोटे-मोठे व्यावसाय करायला कही हरकत नाही. तसेच किंमतीभिमुख ग्राहकाचे मन व्यावसाकिाने ओलखायला पाहिजे. होमडिलेव्हरी सारख्या सेवा ग्राहकांना दिल्या पाहिजेत. ग्राहकांना सेवा देताना उत्पादनाभिमुख व्यावसायिकाने वेळेचे नियोजन करावे. त्याच बरोबर उत्पादन प्रक्रियेतून निर्माण झालेल्या कच-याचे योग्य व्यवस्थापण करूण कच-याचा व्यवसाय सुद्धा करता येतो. त्यातून पैसे कस कम्बायचे याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले प्रधानमंत्री उद्योग योजना, मुख्यमंत्री उद्योग योजना प्रधानमंत्री सूक्ष्मा अन्न उद्योग अणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे कशी जुळवावित किंवा जिल्ला उद्योग केंद्राच काम कसे चालते इत्यादी विषयीची माहिती त्यांनी दिली. कोणत्याही व्यावसायाची सुरुवाद करताना व्यावसायिकाने त्याचा सूक्ष्म अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला पुरेसा अनुभव असल्यास भांडवलाचे नियोजन करता येइल असेही ते म्हणाले कालेच्या दुस-या सत्रामध्ये अड. हेमलता जगदाले (नीरा) यांचे व्याख्यान आजित केले होते. त्यावेळी विद्यार्थना मार्गदर्शन करताना संगीतले की व्यवसाया मध्ये नवीन बदल स्वीकारने गरजेचे आहे व्यवसाया मध्ये आधुनिकताअनन्या साठी जाहिरात, फ्लेक्स लावताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यवसायासाठी गाळा किंवा जागा भाड्याने घेताना कायदेशीर एग्रीमेंट करने गरजे आहे. कारण भांडवल उभारताना बँक ते सर्वप्रथम मागतात. माता उद्योगासाठी धाडस किटी अणि संयम आवश्यक आहे. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य, प्रा जवाहर चौधरी यांनी आपल्या ध्यक्षीय भाषणात सांगि की व्यावसाय करत असताना डोषयावर अणि तोंडात असलेली साखर ग्राहकस आकर्षित करण्यासाठी उपयोगी असते.
महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थिनी शितल गाडदे, विद्यार्थी अभिजीत गोवेकर, दिपक गावडे यांनी कार्यशाळेलेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य, जवाहर चौकी यांनच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. पी.वाय जान, उपप्राचार्य डॉ. जे. एम. साळवे, सह सच्चि सतीश लकडे तसेच महाविध्यालयातील प्रो. डॉ. देविदास वायदंडे, प्रो. डॉ.जया कदम, प्रा. ए. एस. शिंदे, डॉ. एन. सी. आढाव, डॉ. पीवाय ताटे, डॉ नारायण राजुरवार, डॉ डी आर. डुबल, डॉ संजू जाधव, डॉ बाळासाहेब मगजे, डॉ. के. डी. जगताप, अमोल लकडे यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताकि प्रा. पी.वाय. जाधव, सूत्रसंचालन प्रा. पीटी. जाधव आणि उपस्थितीत पाहुण्याचा परिचय उपनाचार्य जे. एम. साळवे व कार्यक्रमाचे आभार वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राहुल खरात यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test