Type Here to Get Search Results !

धक्कादायक;पारगाव येथे किरकोळ वादातून गोळीबार

धक्कादायक;पारगाव येथे किरकोळ वादातून गोळीबार 

पुरंदर प्रतिनिधी 

पुरंदर तालुक्यातील पारगाव येथे किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची घटना काल रात्री समोर आली आहे. जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री संध्याकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान वर नमूद गुन्ह्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला मिळाली घटनेचे गांभीर्य ओळखून जेजुरी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी तात्काळ पारगाव मेमाणे याठिकाणी गेले. त्याठिकाणी प्राथमिक माहिती मिळाली की यातील फिर्यादी यांच्या वडिलांसोबत आरोपी आदित्य कळमकर व आदित्य चौधरी यांचे फिर्यादी यांनी लवकर आरोपी यांना ट्रॅक्टरची साईड दिली नाही म्हणून त्यांना राग आला त्यावेळेस त्यांच्या मध्ये किरकोळ बाचाबाची झाली. नंतर हे दोन्ही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याने त्यांनी तात्काळ त्यांचे इतर 13 साथीदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अशांना बोलून फिर्यादीच्या घरात घुसून हॉकी स्टिक, वाहते लोखंडी हत्यारे यांनी वरील जखमी व फिर्यादी यांना मारहाण केली. गावात दहशत होऊ नये म्हणून त्यांना जे लोक अटकाव करीत होते त्यातील गणेश मेमाने यांच्यावर एक गोळी फायर केली. परंतु सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही नंतर दहशत व्हावी म्हणून वाघापूर चौकामध्ये सुद्धा त्यांनी हत्यारे काढून नंगानाच केला.

     या घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी तात्काळ यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे जेजुरी पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार संदीप करांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, महादेव कुतवळ, पोलीस हवालदार झेंडे, पोलीस हवालदार विठ्ठल कदम, पोलीस हवालदार सोमनाथ चितारे, पोलीस शिपाई धर्मराज खाडे, पोलीस शिपाई प्रवीण शेंडे, पोलीस नाईक कैलास सरक, चालक पोलीस शिपाई भानुदास  सरक, पोलीस नाईक गणेश कुतवळ, पोलीस नाईक अक्षय यादव, पोलीस नाईक खांडे,  पोलीस नाईक देवा खाडे, यांनी सासवड पोलिस स्टेशन व राजगड पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक मगदूम व स्टाफ यांच्या मदतीने राजगड भोर सासवड पोलिस ठाणे अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबवून एकूण पंधरा आरोपी निष्पन्न करून त्यातील अभिजीत विजय भिलारे राहणार भिलारेवाडी तालुका भोर, वैभव बबन थिटे राहणार हातवे तालुका भोर, फारूक हमीद शेख राहणार भांबवडी तालुका भोर, हितेश सुरेश मानकर कापूरहोळ तालुका भोर, गणेश दशरथ गाडे कापूरहोळ तालुका भोर, ऋतिक दिनेश दामोदरे कासबा बारामती, श्रेयस संपत थिटे वीर तालुका पुरंदर या लोकांना भोर, कापूरहोळ, पुरंदर व त्यांच्या वरील पत्त्‍यावरून या ठिकाणाहून ताब्यात घेतले. या गुन्ह्यामध्ये आदित्य भगवान कळमकर राहणार बेलसर व आदित्य तानाजी चौधरी राहणार नारायणपूर हे मुख्य सूत्रधार आहेत. तसेच सागर वायकर पिसर्वे बंडा उर्फ अनिकेत संपत शिंदे खडकी भोर, हर्षद भोसले राहणार कोडीत गोट्य उर्फ अक्षय संभाजी खेनट राहणार पिंपळे तालुका पुरंदर आणि हरी बाळू कुदळे राहणार पारगाव तालुका पुरंदर हेसुद्धा निष्पन्न झाले असून ते अद्याप फरारी आहेत. त्यांना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे वरील सर्व आरोपींच्या वर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यांनी सार्वजनिक व्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न केला त्याला कडक शासन करण्यात येणार आहे. या सर्व आरोपी मध्ये एक विधिसंघर्षग्रस्त बालक सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासन दहशद कृत्य मोडीत काढण्यास समर्थ आहेत.

    पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सोनवलकर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test