Type Here to Get Search Results !

लोकशाहीरांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा : भुजबळ

लोकशाहीरांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा : भुजबळ

दौंडज प्रतिनिधी गोरख मेमाणे - 

विचारांच्या प्रचारासाठी विविध काव्य प्रकारांचा वापर करून समाजात जनजागृती करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे असे मत युवा नेते सागर भुजबळ यांनी व्यक्त केले.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील सिद्धार्थ नगरमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती विविध उपक्रमातून साजरी करण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रमात भुजबळ हे बोलत होते.
   ते पुढे म्हणाले बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान आजही समाजात आदर्शवत मानले जात आहे .
या प्रसंगी वाल्हे पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार केशव जगताप संतोष मदने यांसह सामाजिक कार्यकर्ते अतिश जगताप विकास पवार आर.पी.आय.चे शैलेंद्र भोसले तसेच अविनाश दोडके दीपक भुजबळ शेखर पवार प्रशांत दोडके रोहित भोसले सुनील दोडके किरण कुमठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test