Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर परिसरातील "आपली माणसं" ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना 'एक हात मदतीचा'

सोमेश्वरनगर परिसरातील "आपली माणसं" ग्रुपच्या वतीने  पूरग्रस्तांना 'एक हात मदतीचा'

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरात आपली माणसं या  व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून काही आर्थिक स्वरूपात निधी जमा करत साताऱ्यात सातारा सांगली कोल्हापूर महाड येथील पूरग्रस्त असणाऱ्या काही कुटुंबांना किरणा साहित्य 
मदत म्हणून मिळण्याच्या दृष्टीने केलेला उपक्रम हाच चर्चेचा ठरला व आपली माणसं ग्रुपचे सोमेश्वर नगर परिसरात कौतुकही होऊ लागले त्यामुळे अशा ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवावेत व त्यादृष्टीनेच ग्रुप चा उपयोग करावा असाही संदेश देण्यात आला, अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबियांची घरे उद्ध्वस्त झालेली आहे  तसेच जनजीवन विस्कळीत झाले असून या कुटुंबाला ' एक हात मदतीचा' देण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून  आपली माणसं या ग्रुपने एक हात मदतीचा दिला आहे.. तसेच यापुढेही अशा संकटांना ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्याचा मानस बोलताना ग्रुप सदस्यांनी सांगितला व आजी-माजी सैनिक संघटना कार्यालयात पूरग्रस्तांना किराणा साहित्य  देताना विठ्ठल निर्मळ, हरेश्वर काकडे , रवि गायकवाड , कृष्ण वाईकर विजय थिट्टे,  विजय पाटोळे तसेच पत्रकार विनोद गोलांडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test