महत्वाची बातमी : तीन दिवसाचा निवासी ड्रायव्हिंग सर्टिफिकेट कोर्सचा शुभारंभ.
बारामती प्रतिनिधी
सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व ड्रायव्हिंग प्रशिक्षकांसाठी भारतातील पहिला सर्टिफिकेट कोर्स सी आय आर टी पुणे व महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 ,5 व 6 ऑगस्ट 2021 - तीन दिवसाचा निवासी सर्टिफिकेट कोर्स चे उद्घाटन डॉ.कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील संचालक सी आय आर टी पुणे यांच्या शुभहस्ते शेखर ढोले सचिव वाहन चालन प्रशिक्षण संस्था कासारवाडी पुणे डॉ अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे प्रशांत काकडे सी एम डी सी सी आर टी पुणे या मान्यवरांच्या उपस्थितीत आज कोर्स चे उद्घाटन झाले संजय ससाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या संकल्पनेतून हा सर्टिफिकेट कोर्स भारत देशात प्रथमच सुरू झालेला आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांच्यावतीने सी आय आर टी पुणे व वाहन चालन प्रशिक्षण संस्था आत्तापर्यंत पाच बॅचेस पूर्ण झाले असून ही सहावी बॅच चे उद्घाटन आज पार पडले आत्तापर्यंत एकूण 160 महिला व 110 पुरुष ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आहे . महाराष्ट्र राज्यात ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या एकूण वीस बॅचेस करण्यात येणार आहे व महाराष्ट्र नंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा कोर्स केला जाईल व त्यात सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व त्यांचे प्रशिक्षक भाग घेतील अशी माहिती राजू घाटोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांनी दिली