मागण्या मान्य न झाल्यास राज्य संघटनेने नमुद केल्याप्रमाणे दि १६ ऑगस्ट पासून काम बंदचा ईशारा
मोरगाव प्रतिनिधी
राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीसह , वारसदारांना अनुकंप तत्वावर भरती यासंह विविध मागण्यांसाठी कोतवालांच्या राज्य संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे . मागण्या मान्य न झाल्यास राज्य संघटनेने नमुद केल्याप्रमाणे दि १६ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलनाचा ईशारा दिला आहे . मागण्या मान्य न झाल्यास या आंदोलनात बारामती तालुका कोतवाल संघटनाही सहभागी होणार आहे . याबबातचे निवेदन निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना
तालुका संघटनेच्या वतीने दिले आहे .
राज्यातील ग्रामीण भागात महसूल खाते व जनता यामध्ये कोतवाल एक दुवा समजला जातो . देशाच्या स्वातंत्र्यानंतरही चतुर्थ श्रेणीबाबत त्यांच्या समस्या जैसे थे आहेत . यामुळे कोतवालांच्या राज्य संघटनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विविध मागण्यांसाठी निवेदन दिले आहे . यामध्ये १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे . मागण्या मान्य न १६ ऑगस्टपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन होणार आहे . या कामबंद आंदोलनात बारामती तालुका कोतवाल संघटनाही सामील होणार आहे . याबाबतचे निवेदन काल नायब तहसिलदार धनंजय जाधव यांना दिले .यावेळी तालुका अध्यक्ष संतोष खोमणे, सचिव शेखर खंडाळे, शैलेश नेवसे , विजय स्वामी सचिन निकम ,राहुल पोमनें, अंकुश खोमणे यासह सर्व कोतवाल बांधव उपस्थित होते.
राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळावी , कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना अनेक कोतवालांना आपले प्राण गमवावे लागले असल्याने त्यांच्या वारसदारांना अनुकंप तत्त्वावर कामावर घ्यावे .सेवानिवृत्ती नंतर कोतवालांना कुठलाही लाभ मिळत नसल्याने एकरकमी दहा लाख एपये मिळावेत , शासनाने कोतवालां संदर्भात ६ फेब्रुवारी २०१९ रोजी काढलेले मार्गदर्शक पत्र रद्द करण्यात यावे . कोतवालाना तलाठी तत्सम पदामध्ये पन्नासटक्के आरक्षण द्यावे आदी मागण्या राज्य संघटनेच्यावतीने शासनाकडे केल्या असल्याचे तालुकाध्यक्ष संतोष खोमणे यांनी सांगितले