बारामती पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत
आज शहर व ग्रामीण भागात 1005 ॲन्टीजेन तपासणी
बारामती दि. 04 :- बारामती तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आज पंचायत समिती, आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात घरोघरी जावून ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली .
ॲन्टीजेन तपासणी शिबीर सावळ, सस्तेवाडी, मुर्टी, अंबी खुर्द, कारखेल, साबळेवाडी, सत्यमेव अकॅडमी, तांदूळवाडी वेस, आर.एच.सुपा, डोर्लेवाडी, जीएमसी सीसीसी या ठिकाणी राबविण्यात आले. यामध्ये सावळ 102, सत्यमेव अकॅडमी 81,जीएमसी सीसीसी 155 तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रूग्ण मिळाला नाही. तसेच सस्तेवाडी येथे 116 तपासणी मध्ये 04, मुर्टी येथे 69 तपासणीमध्ये 07, अंबी खुर्द येथे 115 तपासणीमध्ये 02, कारखेल येथे 139 तपासणीमध्ये 11, साबळेवाडी येथे 103 तपासणीमध्ये 01, तांदूळवाडी वेस येथे 99 तपासणीमध्ये 01, आर एच सुपा येथे 16 तपासणीमध्ये 07, डोर्लेवाडी येथे 10 तपासणीमध्ये 05 असे एकूण 43 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. शहर आणि ग्रामीण भागामध्ये आज एकूण 1005 ॲन्टीजन तपासणी करण्यात आल्या, असे पंचायत समिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.