सोमेश्वर मंदिर गाभाऱ्यात वेगवेगळ्या फुलांची सजावट ; मंदिर परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ पुणे विभाग यांच्या वतीने आकर्षक रांगोळी.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रक्षुर्भावमुळे महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे बंद असून श्रावणाच्या चौथा सोमवार दि 30 रोजी बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे ही बंद ठेवण्यात आले तसेच सोमेश्वर शिवलिंग ची नित्य रोजची पुज्या पुज्याऱ्याच्या हस्ते संपन्न होत, सोमेश्वर मंदिर गाभारा फुलांची सजावट लोणकर यांनी केली तर आगार व्यवस्थापक राजगुरूनगर श्रीमती शिवकण्या कानिफनाथ थोरात यांनी त्यांच्या आई वडील यांच्या बरोबर येत मंदिर परिसरात सुबक रांगोळी महामंडळ च्या वतीने कढण्यात आली.
तर, दर वर्षी महराष्ट्रा च्या कानाकोपऱ्यातुन शिव भक्त श्रावण महिना निमित्त हजारोच्या संख्येने करंजे गावातील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर-करंजे येथे दर्शनासाठी येत असतात..
परंतु या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वच मंदिर बंद असल्याने श्रावण महिन्यातील चौथा सोमवारी सोमेश्वर मादीरही बंद असल्याची माहिती सचिव राहुल भांडवलकर यांनी दिली.
वडगांव निंबाळकर पोलिस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
-------------------------------------
जिल्हा शासनाने दिलेल्या आदेशानुसार श्रावण निमित्त श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे मंदिर दर्शनासाठी पुढील आदेशपर्यंत बंद राहील शिवभक्तांनी घरी राहून दर्शन करावे.
देवस्थान अध्यक्ष - प्रताप भांडवलकर