नीरेत अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी भव्य रक्तदान शिबीर
नीरा प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त कै.वसंतराव चव्हाण बहुजन विकास प्रतिष्ठान, नीरा, निरामाई महिला मंडळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नीरा यांच्या वतीने गुरूवारी (दि.५) भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य आयोजक श्री. समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रूग्णांना रक्ताचा तुटवडा भासल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागले. हाच हेतु लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आम्ही, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे
गुरूवारी (दि.५) द्वारकामाई, श्री.समर्थ पतसंस्थेच्या प्रांगणात सकाळी ८ ते ६ या वेळात आयोजित केल्याचे मुख्य आयोजक श्री. समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण यांनी सांगितले.
या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर असणार आहेत.
तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुणे जि.प.चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, जि.प.चे माजी बांधकाम व आरोग्य
समितीचे सभापती दत्ताजीराव चव्हाण, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक आजी माजी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेश चव्हाण यांनी सांगितले.