Type Here to Get Search Results !

ते दुकान फोडून..भोपाळला फरारी झालेल्या आरोपींच्या रांजणगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ते दुकान फोडून..भोपाळला फरारी झालेल्या आरोपींच्या रांजणगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या


पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलीस ठाणे गु.र.नं.303/21 IPC 380, 461 मधील श्री समर्थ मोबाईल & वाॅच कारेगाव या दुकानातील  मोबाईल, लॅपटाॅप, घडयाळे व इतर इलेक्ट्राॅनिक वस्तू असा साधारण 2 लाखाचा माल चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकून  चोरून घेऊन गेले होते.

         सदर घटने बाबत मा.अपर पोलीस अधिक्षक सो मा.उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुभाष  मुंडे, पो.काॅ.2841 शिंदे,  पो.काॅ. 2817 कुतवळ  यांनी आरोपीची आरोपीची गोपनीय माहिती काढुन फायबर क्राईमचे काळी यांचे मदतीने भोपाळ मध्य प्रदेश येथे जाऊन आरोपी शोध घेऊन चोरलेले मोबाईल व घडयाळ असा 2 लाखाचा माल व आरोपीना ताब्यात घेऊन रांजणगाव पोलीस ठाण्यात हजर केले.



1) लकेश लोकचंद पटले वय 23 व्यवसाय नोकरी रा. कारेगाव त. शिरूर जिल्हा पुणे मूळ गोपालपुर थाना katangi जिल्हा बालाघाट

2,) रितिक अनिल धमगाये वय 21व्यवसाय नोकरी . कारेगाव त. शिरूर जिल्हा पुणे मूळ जरीपटका साई मंदिर सुनिल किराणा खुशी नगर ता. जिल्हा नागपूर 

3) shashank राजेंद्र सहारे वय 22 व्यवसाय नोकरी . कारेगाव त. शिरूर जिल्हा पुणे मूळ जरीपटका साई मंदिर सुनिल किराणा खुशी नगर ता. जिल्हा नागपूर यांना ताब्यात घेऊन रांजणगाव पोलीस ठाणे येथे आणले  

        या कामगिरीमुळे नागरिकांनी व वरिष्ठ पोलीस यांनी  पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, सहकारी पोलीस उमेश कुतवळ,  विजय शिंदे यांचे कौतुक केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test