जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य दारू विक्रेत्यांवर छापा ; १२ हजार रुपयांची दारू केली जप्त - पोलीस निरीक्षक सुनील महाडिक
पुरंदर प्रतिनिधी
प्राथमिक माहितीनुसार जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचे पोलीस पथकाने जेजुरी पोलीस (ता पुरंदर ) स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रेते यांच्या वर छापा टाकत विक्रेते यांच्या वर कडक कारवाई केली .
जेजुरी हद्दीतील दारू विक्रेते...
1) वैशाली हरण सिंह राठोड
2) आकाबाई केज राठोड
3) टाकल्या बच्चू राठोड
सर्व रा.जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे
यांचेवर अचानक छापे मारून अवैद्य विक्री साठी आणलेली एकूण १२ हजार रुपयांची दारू जप्त करून दारूबंदी कायद्यान्वये ७ गुन्हे दाखल करून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
तसेच यापुढील काळात देखील अवैध व्यवसाय विरुद्ध कडक कारवाई करणेत येईल, असे त्यांनी सांगितलेले आहे