लव्हलिनच्या ऑलिंपिक कांस्यपदकाचा आनंद सुवर्णपदकासारखाच,लव्हलिनपासून प्रेरणा घेऊन अनेक युवती ‘बॉक्सिंग’कडे वळतील
*टोकियो ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंगचं कांस्यपदक जिंकणाऱ्या*
*लव्हलिनचे उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष*
*अजित पवार यांच्याकडून अभिनंदन*
*लव्हलिन बोर्गोहेन हिच्या बॉक्सिंगमधल्या कांस्यपदकाने*
*देशाचा गौरव आणि देशवासियांना आनंद बहुगुणीत झाला*
*उपमुख्यमंत्री अजित पवार*
*लव्हलिनच्या ऑलिंपिक कांस्यपदकाचा आनंद सुवर्णपदकासारखाच,*
*लव्हलिनपासून प्रेरणा घेऊन अनेक युवती ‘बॉक्सिंग’कडे वळतील*
*उपमुख्यमंत्री अजित पवार*
मुंबई, दि. 4 :- टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या लव्हलिन बोर्गोहेन हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. “तुर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीन हिच्याविरुद्ध लव्हलिन जिंकली नसली तरी तिनं देशवासियाचं मन जिंकलं आहे. टोकियो आलिंपिकमध्ये देशाला तिसरं पदक जिंकून देत तिने देशाचा गौरव, देशवासियांचा आनंद बहुगुणीत केला आहे. लव्हलिननं जिंकलेल्या कांस्यपदकाचं मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. मुष्ठीयुद्धाचा गौरवशाली इतिहासात असलेल्या भारतात लव्हलिनच्या यशापासून प्रेरणा घेऊन अनेक मुली पुढे येतील. देशाचा गौरव वाढवतील”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लव्हलिनेचे कौतुक केलं असून भविष्यातील उज्ज्वल यशासाठी तिला शुभेच्छा देल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, लव्हलिन बोर्गोहेननं ऑलिंपिक बॉक्सिंगच्या 69 किलो वजनी गटातलं ऑलिंपिकपदक आधीच निश्चित केलं होतं. उपान्त्यफेरीत विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीनकडून पराभव पत्करावा लागला तरी, तिनं कडवी झुंज दिली. तीच्या मेहनतीचा, यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. लव्हलिननं जिंकलेले ऑलिंपिक पदक भारतीय बॉक्सिंगचा नवी ऊर्जा, प्रेरणा देईल. विजेंदरसिंगनं 2008 मध्ये, मेरी कोम हिनं 2012 मध्ये जिंकलेल्या बॉक्सिंगच्या ऑलिंपिक पदकांनंतर देशासाठीचं तिसरं ऑलिंपिक पदक जिंकून लव्हलिननं इतिहास घडवला आहे. लव्हलिनच्या यशाचा महाराष्ट्राला, देशाला अभिमान असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.