"अविष्यात ट्रस्ट " ठाणे यांच्यावतीने सोमेश्वर मंदिर येथील भोसले कुटूंबियांना किराणा साहित्य वाटप.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने गरीब कुटुंबांचे जगणे मुश्कील झाले आहे . तसेच घडशी समाजही मंदिर बंद असल्याने त्यांचा व्यवसाय ही ठप्प झाला आहे.. लग्न सराई, छोटे मोठे कार्यक्रम करत कसतरी आपले पोट भरत असताना कोरोनाच्या महामारीने शासनाने लग्न समारंभ बंद तर कमी लोकांच्यात करणे त्यामुळे वाजंत्री व्यसयावर उतरती कळा आली असल्याने त्यांना एक हात मदतीचा म्हणून "अविष्यात ट्रस्ट " ठाणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ मिलिंद बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर मंदिर परिसरात भोसले कुटूंबाला किराणा साहित्य घरपोच वाटप केले हे साहित्य मिळाल्याने या कुटुंबातील नागरिक यांनी ट्रस्ट चे आभार मानले.
याच वर्षी कोरोनाच्या काळातही गरजू कुटूंबाला किराणा साहित्य गरजू कुटूंबाला मदत पोच करण्यात आली होती ट्रस्ट अध्यक्ष डॉ मिलिंद बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरात नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत त्यांना विविध प्रकारची मदत करणात आसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
किराणा साहित्याचे शामराव भोसले कुटूंबाला वाटप प्रसंगी वडगांव निंबाळकर अंकित करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस कर्मचारी दिपक वारुळे ,सोमेश्वर देवस्थान मा अध्यक्ष मोहन भांडवलकर, सुखदेव शिंदे, सुनील जोशी,बाळू शिंदे,पत्रकार विनोद गोलांडे ,पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.