विद्युत नियंत्रण समितीची पहिली बैठक संपन्न.
बारामती प्रतिनिधी
आज उर्जाभवन बारामती या ठिकाणी बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीची पहिली बैठक समितीचे ॲड.रविंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये महावितरण तर्फे चालू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला व प्रलंबित कामाबाबत ही सकारात्मक चर्चा करण्यात आली. ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच वीज बिल वसुली, गावोगावी असलेल्या वीज ग्राहकांना व शेती पंप ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या कश्या पद्धतीने सोडवायल्या हव्यात व त्यातून मार्ग काढण्यासंदर्भात ही सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात ॲड.रविंद्र माने यांनी सांगितले की आज आपण महावितरण व कमिटी हे एका कुटुंबाप्रमाणे असून महवितरण अधिकारी कर्मचारी वर्ग व अशासकीय कमिटी सदस्य एकत्र मिळून आता काम करावे लागणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती तालुका एकात्मिक व पुनर्विकास कमिटीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या सहकार्याने वीज ग्राहकांना येणाऱ्या अडचणी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न ही कमिटी करेल तसेच सर्व महावितरण चे अधिकारी यांचीदेखील सहकार्य लाभेल अशी आशा आहे.
यावेळी पुणे जिल्हा परिषद चे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी तावरे, विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य संजय दुधाळ, वैभव बुरुंगले, विश्वास मांढरे, विश्वास आटोळे, सुनील खलाटे, निलेश केदारी महावितरण चे कार्यकारी अभियंता लटपटे तसेच गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका कृषी अधिकारी बालाजी ताटे व उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे व आभार उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांनी मानले.