Type Here to Get Search Results !

समाजसेवा व्हाट्सअँँप ग्रुप सोमेश्वरनगर/निरा यांच्या सदस्यांकडुन (कोरोना व पुरग्रस्त भागात) मदत करण्यासाठी एकुण २ लाख २८हजार ७७१रू. ऑनलाईन निधी जमा

समाजसेवा व्हाट्सअँँप ग्रुप सोमेश्वरनगर/निरा यांच्या सदस्यांकडुन (कोरोना व पुरग्रस्त भागात) मदत करण्यासाठी एकुण २ लाख २८हजार ७७१रू. ऑनलाईन निधी जमा 
सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

समाजसेवा ग्रुप दि.१८/७/२०१४ रोजी २५६ सदस्यांनी एकत्र येवुन तयार केला असुन ग्रुप मध्ये विविध क्षेत्रातील, विविध पक्षाचे, विचारांचे सदस्य असुन सामाजिक कार्यात ग्रुपचा कायम सक्रिय सहभाग असतो.
मध्यंतरी समाजसेवा ग्रुपने कोव्हीड काळात बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण तालुक्यातील ११ कोव्हीड सेंटरला १,११,000/- रूपयांचे आर्थिक मदत केली आहे.आज कोल्हापुर, सांगली व सातारा भागात महापुराचे महासंकट उभे राहिल्याने ग्रुपच्या सदस्यांनी १लाख १७हजार७७१/- रू. मदत निधी जमा केला आहे. कागल जिल्हा कोल्हापुर येथील खडकेवाडा व गलगले पुरग्रस्त भागात ९०० रूपये किंमतीचे २८ किराणा किट देण्यात आले. यासाठी २५,000/- रू. मदत निधी देण्यात आला. यासाठी मा.संतोष आबा शेंडकर व मा.योगेश यादव सोळस्कर, डॉ राहुल खरात, मदन काकडे व  राजकुमार बनसोडे यांनी नियोजन केले. तर सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात जुने खेड गावामध्ये २५,000/- रू. पर्यंतचे साहित्य वाटप करण्यात आले यासाठी  राहुल जगताप,  संग्राम जगताप,  प्रसाद सोनवणे,  धैर्यशिल काकडे व योगिराज काकडे यांनी नियोजन केले. तर पाटण तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये मरळी ग्रा.पं तर्फे आंबेघर गावासाठी ५०,000/- रू. मदत निधीचा चेक मा.ना.शंभुरोजे
देसाई (गृहराज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांना  राहुल काकडे,  प्रियराज काकडे,  अमरदिप काकडे,डॉ सौरभ काकडे यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आला. सदस्यांचे मदत करण्याचे काम सुरू असुन १७,७७१/रू. निधी शिल्लक आहे तो महाड कोकण भागात मदत करण्याचे ग्रुपने उदिष्ट ठेवले असुन यासाठी  संतोष सोरटे,  अंकुशराव जगताप, पी.एल.दादा निगडे व  परवेश मुलाणी नियोजन करीत आहेत. या सामाजिक कार्यात सर्व सदस्य एक जिवाने काम करीत असुन भविष्यात समाजसेवा ग्रुप समाजकार्यात कायम अग्रेसर असेल ग्रुपच्या या कार्यामुळे नविन आदर्श निर्माण झाला आहे. जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे,  अजयजी कदम,  राहुल काकडे,  अभिजित काकडे, अॅड. गणेशजी आळंदीकर, दिलीप,आप्पा खैरे,  गौतम काकडे,  राजेंद्र गलांडे,  टी.के.जगताप,  महेश जगताप, हेमंत घाडगे ,  कुमारभाऊ जगताप,  राहुल शिंदे,  विनोद गोलांडे, हेमंत गडकरी, राजेंद्र निंबाळकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

    समाजसेवा ग्रुपच्या कायदेशिर सल्लागार पदी ॲड. गणेश आळंदिकर  यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांचे पत्रकार क्षेत्रातील योगदान, न्यायपालिकेतील उत्कृष्ट कामकाज, त्यांचे प्रकाशित झालेले कायद्याचे पुस्तक तसेच माजी सैनिक संघटनेमध्ये असलेले उल्लेखनिय कार्य, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये शासनाने केलेली नियुक्ती, शासनाच्या वतीने नोटरी पदी नियुक्ती, तसेच त्यांचा समाजकार्यात असणारा दांडगा अनुभव अशा विविध कारणास्तव त्यांची आपल्या समाजसेवा ग्रुपवर कायदेशिर सल्लागार म्हणुन निवड करण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test