Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर परिसरातून चोरी गेलेला ट्रॅक्टर तब्बल दीड वर्षाने मालकाच्या स्वाधीन- वडगाव निंबाळकर पोलीसांची कामगिरी




सोमेश्वरनगर परिसरातून चोरी गेलेला ट्रॅक्टर तब्बल दीड वर्षाने मालकाच्या स्वाधीन- वडगाव निंबाळकर पोलीसांची कामगिरी


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरातील असणाऱ्या  पुणे जिल्हा बँके शेजारी लावलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली अज्ञात चोरट्यानी  दिनांक १४ जानेवारी २०२० रोजी चोरी  सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातून झालेला होता. आज अखेर  या घटनेला तब्बल दीड वर्षे होऊन गेली होती परंतु वडगाव निंबाळकर पोलिसांच्या  वेळोवळच्या पाठपुरावामुळे अखेर यश आले चोरी गेलेला ट्रॅक्टर मंगळवारी दि 24 रोजी करंजेपुल दुरक्षेत्र येथे  सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या उपस्थितीत हा ट्रॅक्टर मालकाला स्वाधीन केला. यावेळी वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस हवालदार दिपक वारुळे, पोलीस हवालदार रमेश नागटिळक, पोलीस नाईक नितीन बोराडे, पोलीस नाईक अमोल भोसले, पोलीस शिपाई महादेव साळुंखे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नामदेव शिंगटे, विशाल गायकवाड, लालासाहेब नलवडे, किशोर भोसले, लालासाहेब माळशिकारे, ट्रॅक्टर मालक सचिन जगताप तसेच प्रभाकर जगताप, प्रदीप जगताप तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सदरचा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर मालक यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे.  सदर गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक नितीन बोराडे यांनी केलेला आहे गुन्ह्यात केले तपासाबाबत संचालक मंडळातर्फे वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे ,करंजेपुल दूरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक योगेश शेलार व पोलीस हवालदार नितीन बोराडे यांचे आभार मानले.  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test