Type Here to Get Search Results !

प्रशासनाच्या वतीने तहसिल कार्यालयात सद्भावना दिन साजरा

प्रशासनाच्या वतीने तहसिल कार्यालयात सद्भावना दिन साजरा


बारामती दि. 20 :  तहसिल  कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी तहसिलदार विजय पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
"मी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनियम करुन व संविधानिक मार्गानी  सोडवीन," अशी प्रतिज्ञा यावेळी देण्यात आली.
 यावेळी महसूल नायब तहसिलदार महादेव भोसले, निवडणूक नायब तहसिलदार पी.डी. शिंदे, यांच्यासह तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test