Type Here to Get Search Results !

संजय गांधी निराधार अनुदान योजनेची १४८ प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार अनुदान योजनेची १४८ प्रकरणे मंजूर

बारामती प्रतिनिधी

 संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय भवन बारामती याठिकाणी मिटिंग संपन्न झाली.
     मिटिंग मध्ये संजय गांधी निराधार योजनेची १०८ व श्रावणबाळ योजनेची ५० तसेच इंदिरागांधी योजनेतील ६ अशी एकूण लाभार्थींची १६४ प्रकरणे सादर करण्यात आली होती.
    त्यापैकी संजय गांधी योजनेची १०२ प्रकरणे मंजूर व ६ नामंजूर करण्यात आली तसेच श्रावणबाळ योजनेची ३८ प्रकरणे मंजूर व नामंजूर १२ आणि इंदिरा गांधी योजनातील सर्व ६ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
    त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत एकूण १० प्रस्ताव पैकी ८ प्रकरणे मंजूर करण्यात आली. पात्र लाभार्थींना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. 
      यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक, तहसिलदार विजय पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर, महादेवराव भोसले, संजय गांधी योजना समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, लालासो होळकर, निलेश मदने, अशोक इंगोले व अव्वल कारकून सुरेश जराड आदी उपस्थित होते. सदर माहिती संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सुनिल बनसोडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test