कृष्ण जन्माष्टमी निमित्त सोमेश्वर मंदिर परिसरात चिक्की वाटप...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
श्री सेवाभावी संस्था सोमेश्वर पंचक्रोशी यांच्या वतीने सोमेश्वर मंदिर परिसरात कृष्ण जन्माष्टमी निमित्त
गेले दहा वर्ष भव्य अन्नदान सोहळ्याचे आयोजन केले जातअसते परंतु दोन वर्षे कोरोना संकटामुळे व शासनांच्या नियमाचे पालन करत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोमेश्वर भाविक भक्तांना गेल्या वर्षी केळी व मास्क वाटप तर या वर्षी राजगिरा चिक्कीचे वाटप करून सोहळा संपन्न करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी श्री सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे ,जालिंदर शेंडकर,संतोष शेंडकर, माऊली केंजळे, पोपट चौधरी, प्रकाश सुतार , रवी पवार, दत्तात्रय फरांदे, नितीन शेंडकर, संदीप शेंडकर, विलास नाईक, यादवराव शिंदे,महेंद्र गायकवाड , उद्योजक संतोष कोंढाळकर , पत्रकार विनोद गोलांडे उपस्थित होते.