Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांची भूमीपूजन व उद्धाटन

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते विविध विकास
कामांची भूमीपूजन व उद्धाटन
बारामती प्रतिनिधी

बारामती नगरपरिषदेच्यावतीने सर्वे नं. 220 येथे  दुर्गा टॉकिजच्या समोर कमर्शियल कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरु करण्यात येत आहे. या ठिकाणचे  भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव यांच्यासह नगरपरिषदेचे सदस्य, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

तसेच मौजे मळद येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे उद्घाटनही  उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती  प्रमोद काकडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, उपसभापती रोहित कोकरे, बारामती तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. मनोज खोमणे, सरपंच योगेश बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test