Type Here to Get Search Results !

कोरोनामुळे घडशी समाजावर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे घडशी समाजावर उपासमारीची वेळ

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी समाज असून, सध्या कोरोनामुळे आमच्या समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे असताना तालुक्यातील  श्री सोमेश्वर सेवा भावी संस्था यांनी श्यामराव भोसले  कुटूंबाला किराणा साहित्य किट दिले व दिल्याने थोड्या दिवसाचा का होईना त्यांचा पोटाचा प्रश्न मिटलेला आहे.मदत देते वेळी यावेळी अध्यक्ष सुखदेव शिंदे, बारामती तालुका अखिल भारतीय वारकरी संप्रदाय अध्यक्ष मोहन भांडवलकर ,आजी-माजी सैनिक संघटना कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर,पिंगळे महाराज , करंजे मा.सरपंच बाजीराव शिंदे,मा उपसरपंच कैलास गायकवाड ,अनिल भंडलकर देवस्थानचे खजिनदार सोमनाथ भांडवलकर, विश्वस्त राजेंद्र भांडवलकर ,नितीन शेंडकर, भटक्या जाती जमाती बारामती तालुका उपाध्यक्ष प्रताप गायकवाड, देवस्थान मा अध्यक्ष रामदास भांडवलकर ,दादा कामठे, भारतीय पत्रकार संघ चे बारामती तालुका उपाध्यक्ष विनोद गोलांडे इ उपस्थित मन्यावर होते तर सोमेश्वरनगर परिसरातील  सर्व सामाजिक संघटना  ग्रामस्थांनी मदत करावी असेही आवाहन केले.

पूर्वीपासून श्री क्षेत्र सोमेश्वर-करंजे देवस्थानांमध्ये सनई-चौघडा, नगारा त्रिकाळ वाजवण्याची  सेवा करत असून लग्न समारंभामध्ये सनईवादन बँड, बेंजो,मात्र सध्या सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून, आमच्या समाजातील अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे राज्य सरकार व सर्वच समाजातील दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत करून दिलासा द्यावा, असे भोसले यांनी सांगितले. पूर्वीपासूनच गरिबीत जीवन जगणारा हा समाज भूमिहीन आहे. त्यामुळे वरील व्यवसायावरच कसेबसे जीवन जगतो व या व्यवसायावर अवलंबून असतो. समाजात दररोज रोजी-रोटीचा प्रश्न असल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक सरकारी, खासगी नोकऱ्यांमध्ये आहेत. गेले दोन वर्षी कोरोनामुळे कोणताही व्यवसाय चालला नाही. सरकारी कोणतीही मदत समाजाला मिळाली नाही. भूमी नाही, शिक्षणाची इच्छा असून, घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे शिक्षणाचा अभाव, त्यामुळे सरकारी बँकेचे लोन व्यवसायाला मिळत नाही. मग या स्पर्धेच्या युगात टिकून राहून व्यवसाय चालावे, यासाठी खासगी कर्ज काढून वरील व्यवसायात गुंतवणूक केली. कोरोनामुळे ते कर्जही फिटले नाही. जवळची जी काही थोडी पुंजी  भोसले (देऊळवाडी)  यांच्या कुटुंबीयांकडे होती तीसुद्धा गेल्या काही महिन्यातच  मुलाला कोरोना चा प्रादुर्भाव जास्तीचा झाल्यामुळे दवाखान्याच्या निमित्ताने ती ही संपली मुलगा  ही गमावला आहे  त्यांच्या कुटुंबावर आर्थिक परिस्थिती डगमगले ली आहे, तिची मोडतोड करून कसंतरी जीवन जगावं लागलं. व्यवसाय ठप्प असल्याने  कसंतरी आत्तापर्यंत कुटुंब जगवलं.
माझ्या बरोबर इतरत्र असलेल्या समाजबांधवांचे तर खूपच हाल झाले. पुढे चांगले दिवस येतील, ही आशा घेऊन कसंतरी दिवस ढकलले; परंतु याहीवर्षी कोरोनाने डोकं वर काढलं आणि समाज पुरता कोलमडून पडला असून, सलग दोन वर्षे कोरोनाने सगळंच ठप्प झालं आहे.
इथून पुढे कसं जगायचं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

....अत्यंत महत्वाची सूचना...

समाजातील एकही शासनात पदाधिकारी नाही. त्यामुळे आमच्या समाजाची दखल घेतली जात नाही, अशी खंत श्यामराव भोसले व त्यांच्या दोन बंधूनी बोलून दाखवली. शासनाकडून समाज दुर्लक्षित आहे. गेली दोन वर्षे कसेबसे जीवन जगत आहे. प्रचंड ओढाताण, हाल-अपेष्टा हा समाज भोगत आहे. तरी शासनाला विनंती आहे की, समाजाची दखल घेऊन समाजाला दानशूर व्यक्तींनी काहीतरी मदत करावी... 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test