Type Here to Get Search Results !

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी दिन वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे साजरा.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी दिन वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे साजरा.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

रविवार दि.२२ ऑगस्ट पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी दिन साजरा केला जातो, 
       त्यानिमित्ताने बारामती तालुका कृषि विभाग कार्यालयाच्या वतीने वाघळवाडी-सोमेश्वरनगर तील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पीक व्यवस्थापनाबरोबरच सेंद्रिय पिक पद्धती, तुटलेल्या ऊसाचे पाचट व्यवस्थापन , तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी  रासायनिक खतांचा कमीत- कमी वापर करणे या गोष्टींबद्दल बारामती तालुक्याच्या कृषि अधिकारी सुप्रिया शिळीमकर - बांदल यांनी मार्गदर्शन केले.त्याबरोबरच उपस्थित शेतकऱ्यांना ई -पीक पाहणी या डिजिटल ॲपची माहिती दृकश्राव्य माध्यमातून देण्यात आली .याप्रसंगी बारामती तालुका कृषि अधिकारी सुप्रिया शिळीमकर - बांदल यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत वाघळवाडी- सोमेश्वरनगर व ग्रामस्थांच्या वतीने त्यांची कृषि अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सरपंच नंदा सकुंडे यांचे शुभहस्ते शाल , श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तर उपस्थित शेतकरी बांधवांचा सन्मान उपसरपंच जितेंद्र सकुंडे ,सदस्य हेमंत गायकवाड ,पांडुरंग भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.


 या कार्यक्रमासाठी वाघळवाडी-सोमेश्वरनगर कृषी सहाय्यक ओंकार चव्हाण यांनी नियोजन केले. सोसायटीचे संचालक अनिल शिंदे, युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे, बाळासाहेब सावंत,नारायण जाधव,भगवान सावंत, बापुराव सावंत,नबाजी सावंत,चंद्रकांत सावंत ,सदाशिव सावंत, सोमनाथ मांगडे , संभाजी भुजबळ , प्रवीण जाधव, सुभाष शिंदे,संकेत सावंत,रवींद्र सावंत,आदी शेतकरी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बारामती शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश सावंत यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test