Type Here to Get Search Results !

पोलीस बांधव हे सख्खे बंधुचं - नंदिनी मदने


पोलीस बांधव हे सख्खे बंधुचं - नंदिनी मदने

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी (ता बारामती)

सदरक्ष्नय खलनिग्रहाय यांनी समाजाची सेवा आणि संरक्षण करणाऱ्या पोलीस बंधूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत आणि कोरोना महामारीपासून समाजाला वाचवण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न अविस्मरणीय आहेत. राष्ट्र आणि समाज सर्वप्रथम, पोलीस समाजाला एक कुटुंब बनवतात आणि आपले कर्तव्य पार पाडत राहतात. 
असे असताना वडगाव निंबाळकर च्या जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पै.नानासाहेब मदने यांच्या पत्नी नंदिनी मदने व कन्या कु.आर्या मदने यांच्या वतीने बारामती तालुक्यातील
वडगाव निंबाळकर च्या ठाण्याच्या 
पोलीस बांधवां राखी बांधत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.
  रक्षाबंधन हा सण मदने कुटूंब  गेली ५ वर्षे  पोलीस बांधवांच्या हातात जि पवित्र राखी बांधल्यावर जे हास्य दिसते ते बघुन आम्हाला समाधान भेटते. त्यात च आम्ही आमचे खुप भाग्य समजतो की आम्हाला ही सख्या भावाप्रमाणे हे पोलीस बांधव आहेत. असाही संदेश यानिमित्ताने देत  ह्याही वर्षी वडगांव निंबाळकर पोलिस ठाण्यात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.
     यावेळी वडगांव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे , गोपनीय चे ज्ञानेश्वर सानप,पोलिस हवालदार महेंद्र फणसे,पोलिस हवालदार बाळासाहेब पानसरे,पो.नाईक सलमान खान,पोलिस हवालदार तौशिब मनेरी,पो.नाईक हिरामण खोमणे,पो.नाईक पोपटजी नाळे,पो.शिपाई भाग्यवंत इत्यादी अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test