पिंपळी येथील थोरात कुटुंबातील दोन सख्या बहिणींचे दहावी-बारावीत घवघवीत यश
बारामती प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड एस.एस.सी. व महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्ड एच.एस.सी. बोर्डाचा नुकताच ऑनलाइन निकाल जाहीर झाला.
त्यामध्ये कु.समिक्षा अविनाश थोरात हिचा विद्या प्रतिष्ठान संचलित "न्यू बालविकास, इंग्लिश मिडीयम स्कूल" पिंपळी या विद्यालयातून सीबीएससी अभ्यासक्रमातून ९४.४०% मार्क्स मिळवित विद्यालयात द्वितीय क्रमांक आला. तर चैतन्य ॲकॅडमी बारामती येथील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून कु.दिक्षा अविनाश थोरात हिने ९५.८०% एवढे गुण मिळवित चांगले यश संपादित केले.
त्यांच्या या यशाने गावाचा नावलौकिक वाढला असून संपूर्ण गावातुन कौतुकाची त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत असून दोन्ही बहिणींनी मिळविलेल्या घवघवीत यशाची चर्चा सर्व पंचक्रोशीत होत आहे.