आनंदाची बातमी:;सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांने झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत वाघळवाडी-सोमेश्वरनगर ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांने आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ करण्यात आली आहे.
सोमेश्वर कारखाना ग्रामपंचायतीला देत असलेल्या ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ व्हावी याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी मासिक सभेत ठराव घेतला होता. यासाठी सोमेश्वर कारखान्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ असल्याने त्यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ व्हावी म्हणून वाघळवाडी-सोमेश्वरनगर सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी वतीने मागणी करण्यात आली होती. त्यानुसार झालेल्या चर्चे दरम्यान अजित पवार यांनी संचालक मंडळ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांना निर्णय घेण्यास सांगितले होते.
सोमेश्वर कारखान्याची आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये वार्षिक २० लाख रुपये महसूल देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वर्षाला १०% वाढ करण्याचा निर्णय झाला असल्याने ग्रामपंचायतीच्या महसुलात वर्षाला वाढ होणार आहे.
वाघळवाडी ग्रामपंचायतीचा विस्तार होत असल्याने वाढ होणे आवश्यक होते.त्यानुसार कारखान्याच्या संचालक मंडळाने ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव तसेच संचालक मंडळाचे आभार मानण्यात आले. संचालक मंडळाच्या बैठकी मध्ये झालेल्या चर्चेवेळी दरम्यान राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतिश सकुंडे,राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष विजय सावंत,समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, राष्ट्रवादीचे बारामती शहरचे शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश सावंत,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भोसले, ज्येष्ठ ग्रामस्थ आनंदराव सावंत, कल्याण तुळसे,अनिल शिंदे, विजय गायकवाड, जालिंदर सावंत,रामचंद्र जाधव,रामचंद्र शिंदे,तुकाराम जाधव उपस्थित होते.
*****************************************
वाघळवाडी गावचा विस्तार वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कराव्या लागणा-या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी ग्रामनिधी मध्ये वाढ होणे जरूरीचे होते. यासाठी अजितदादा यांच्याकडे सोमेश्वर कारखान्याकडून मिळणाऱ्या महसुलात वाढ होण्याबाबत भेट घेऊन पाठपुरावा होता. त्यानुसार कारखान्याने महसुलात वाढ झाल्याने गावातील समस्या मिटणार असून सोई-सुविधा पुरविणे शक्य होणार असल्याचे मत युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे आणि सदस्य हेमंत गायकवाड यांनी सांगितले.