पुरंदर प्रतिनिधी
दुर्लक्षित पुरातन मंदिराचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा यासाठी अजिंक्य टेकवडे युवा मंचातर्फे गुळुंचे परिसरातील "बोल्हाई माता" या भुयारी व पौराणिक असलेल्या मंदिरासह येथील परिसराची साफ सफाई करण्यात आली आहे.................
गुळुंचे परिसरात उत्तम कलाकसुरीचा नमुना ठरणारी अनेक मंदिरे आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु अशा मंदिराची माहिती जनसामान्यांना व्हावी तसेच पर्यटन विभागा सह युवा पिढीला देखील या मंदिरांची भुरळ पडावी या उद्देशाने अजिंक्य टेकवडे युवा मंचासह या भागातील जवळपास 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत येथील बोल्हाई माता या पुरातन मंदिराची व येथील परिसराची साफसफाई केली. यावेळी अजिंक्य टेकवडे युवा मंचातर्फे या ठिकाणी कचरा कुंड्या देखील उपलब्ध करून देण्यात आल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या मोहिमेत बारामती लोकसभा राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष प्रमोद निगडे दौंडज विकास सोसायटी चे माजी अध्यक्ष अमोल कदम कर्नलवाडी चे सरपंच सुधीर निगडे यांसह विशाल भोसले मेघराज निगडे सचिन थोपटे शुभम निगडे नितीन साळुंखे विशाल थोपटे रणजित निगडे सुदर्शन भोसले मयूर गोरगल सागर मुळीक दत्तात्रेय महानवर विशाल गायकवाड अभिषेक मुळीक आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला होता.