Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी;विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थीनींनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत.

महत्वाची बातमी;विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थीनींनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत.


  पुणे, दि.४:- सन २०२०-२०२१ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्यादित) मुंबई मार्फत राबविल्या जाणा-या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैदयकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य (६०% पेक्षा जास्त ) गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थीना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत  गुणानुक्रमे मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी पत्रकानव्ये दिली.
      सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या विध्यार्थ्यांनी आपले अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हे नंबर १०३,१०४ मेन्टल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर, येरवडा, पुणे- ०६ येथे कागपत्रांसह सादर करावे.
     साध्या कागदावर फोटो लावून अर्ज करावा.(भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा), अर्ज सादर करतांना सोबत जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड (शिधापत्रिका) छायांकीत प्रत, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबतचा पुरावा ही कागदपत्रे जोडावीत.
      मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज कागदपत्रांच्या छायांकीत प्रती स्वयंसाक्षांकित करुन वरील पत्यावरील या कार्यालयाकडे १२ आँगस्ट २०२१ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत पोहोचतील अशा बेताने पाठवावे, असेही आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test